मराठी माणूस
मराठी माणूस - एम. एम. - महेश मांजरेकर
महेश मांजरेकर आहे एक मराठी माणूस आणि मराठी माणूस आहे महेश मांजरेकरच्या प्रत्येक कलाकृती मधला एक विलोभनीय अविष्कार.
या ब्लॉगमध्ये आविष्काराचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत.
बरं, नुसतं मराठी लोकांच्या कलेला वाव देऊन हा माणूस थांबला नाहीये. त्याच्या सिनेमामध्ये त्याने मराठी माणूस फुलवलाय पण अगदी सुरेख, अगदी हुबेहूब.
मिल कामगारांची वेदना असो, गर्दीतल्या मराठी माणसाची ससे-होलपट असो, आईचा जिव्हाळा असो, शिव-छत्रपतींची गौरव गाथा असो - सगळं काही तितक्याच अचूकपणे आणि भेदकपणे रंगवतो महेश.
मंजूची अगतिकता आपल्या जिव्हारी लागते, राणेची नामुष्की आपल्याला झोंबते, सन्नाटाची अबोली बरंच काही सांगून जाते, पापलेट ऐवजी मांदेली घेण्याचा सल्ल्याने आपलीच चिडचिड होते, छत्रपतींच्या कान-उघड्णीने आपणच लाजतो, मधुकरचा त्रागा आपल्याला बेजार करून जातो, डेड फुटीयाची दोस्ती आपल्याला भावून जाते, गोपीनाथची लाचखोरीही आपण समजुतीने स्वीकारतो, 'दे धक्काच्या' टम टम मध्ये आपण स्वतःला ही एक जागा बनवून घेतो, रघु जेव्हा त्याच्या आईला पाव-भाजीची गाडी टाकण्यासाठी त्याने आखलेली गोळा-बेरीज समजावतो, तेव्हा त्याच्या बरोबर आपल्याला ही धंद्याचा हुरूप चढतो, लक्ष्मीची गंगावर असलेली माया बघून आपणही मातृत्वाच्या ओलाव्याने भारावून जातो, समुद्र किनारी दुःखाच्या आक्रांताने ओरडत असतो स्पीड ब्रेकर, पण वेदना होत असतात त्या आपल्या मनाला!!
या सगळ्याचे श्रेय मी त्या कलाकारांच्या अभिनयाला नक्कीच देईन आणि त्याच बरोबर ते महेश च्या दर्जेदार लेखनाला, उत्कृष्ट दिग्दर्शनाला, प्रयोगशील निर्मिती कौशल्याला ही देईन.
मराठी माणूस - एम. एम. - महेश मांजरेकर
अद्याक्षारांच्या खेळात चपखळ बसणाऱ्या या दोन्हीचे नाते हि तितकेच अतूट आहे.
महेश मांजरेकर आहे एक मराठी माणूस आणि मराठी माणूस आहे महेश मांजरेकरच्या प्रत्येक कलाकृती मधला एक विलोभनीय अविष्कार.
या ब्लॉगमध्ये आविष्काराचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत.
बॉलीवूड मध्ये म्हणे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचा एक कंपू असतो. महेश मांजरेकरचा पण आहे. आणि 'एक मराठी माणूस दुसऱ्याचे फक्त पाय खेचू शकतो, त्याची मदत करू शकत नाही' या आपल्या समुदायाच्या कुप्रसिध्द ख्यातिला झुगारून देत महेश च्या प्रत्येक हिंदी सिनेमामध्ये आपल्याला आढळतात ते शिवाजी साटम, रिमा लागू , सिद्धार्थ जाधव, सचिन खेडेकर, किशोर नांदलस्कर, अंकुश चौधरी, सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, स्मिता जयकर, नम्रता शिरोडकर असे एक-ना-अनेक मराठी चेहरेच. 'मराठी तेतुका मेळवावा' हे ब्रीद महेशने पुरेपूर अमलात आणलंय!
बरं, नुसतं मराठी लोकांच्या कलेला वाव देऊन हा माणूस थांबला नाहीये. त्याच्या सिनेमामध्ये त्याने मराठी माणूस फुलवलाय पण अगदी सुरेख, अगदी हुबेहूब.
त्याच्या सिनेमामध्ये आपल्याला, आपल्या रोजच्या पाहण्या मधले लोक, पेहराव, स्वभाव, समस्या सगळं काही अगदी सर्रास आढळते.
'प्राण जाये पर..' मधले चाळकरी असोत, 'जिस देस मे..' मधले धनगर असोत, किंवा 'वास्तव' आणि 'लालबाग-परेल' [सिटी ऑफ गोल्ड] मधले युवक असोत - सगळे कसे ओळखीचे वाटतात, आपल्या आस-पासचे वाटतात.
मिल कामगारांची वेदना असो, गर्दीतल्या मराठी माणसाची ससे-होलपट असो, आईचा जिव्हाळा असो, शिव-छत्रपतींची गौरव गाथा असो - सगळं काही तितक्याच अचूकपणे आणि भेदकपणे रंगवतो महेश.
महेशने पडद्यावर साकारलेले मराठी मनाचे विविध पैलू पाहताना आपण ही आपसूकच त्यांच्यातलेच एक पात्र बनून जातो.
मंजूची अगतिकता आपल्या जिव्हारी लागते, राणेची नामुष्की आपल्याला झोंबते, सन्नाटाची अबोली बरंच काही सांगून जाते, पापलेट ऐवजी मांदेली घेण्याचा सल्ल्याने आपलीच चिडचिड होते, छत्रपतींच्या कान-उघड्णीने आपणच लाजतो, मधुकरचा त्रागा आपल्याला बेजार करून जातो, डेड फुटीयाची दोस्ती आपल्याला भावून जाते, गोपीनाथची लाचखोरीही आपण समजुतीने स्वीकारतो, 'दे धक्काच्या' टम टम मध्ये आपण स्वतःला ही एक जागा बनवून घेतो, रघु जेव्हा त्याच्या आईला पाव-भाजीची गाडी टाकण्यासाठी त्याने आखलेली गोळा-बेरीज समजावतो, तेव्हा त्याच्या बरोबर आपल्याला ही धंद्याचा हुरूप चढतो, लक्ष्मीची गंगावर असलेली माया बघून आपणही मातृत्वाच्या ओलाव्याने भारावून जातो, समुद्र किनारी दुःखाच्या आक्रांताने ओरडत असतो स्पीड ब्रेकर, पण वेदना होत असतात त्या आपल्या मनाला!!
या सगळ्याचे श्रेय मी त्या कलाकारांच्या अभिनयाला नक्कीच देईन आणि त्याच बरोबर ते महेश च्या दर्जेदार लेखनाला, उत्कृष्ट दिग्दर्शनाला, प्रयोगशील निर्मिती कौशल्याला ही देईन.
आणी या सर्वांपेक्षा ही जास्त श्रेय मी देईन, ते त्याच्यातील मराठी माणसाला, मराठी माणसाचे भावगंध ओळखण्याच्या त्याच्या कलेला, मराठी मनाच्या सर्व छटा हुबेहूब साकारण्याच्या त्याच्या किमयेला, आपला मराठी बाणा कायम राखण्यासाठी त्याने केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला..
आपले समस्त भाव-विश्वच जिथे तो त्याच्या कलाकृती मध्ये साकारतो, तिथे आपली आणि त्याच्या कलाकृतींची नाळ ही जोडली जाणारच!!

आणि अशी ही नाळ जोडली गेली, कि महेश मांजरेकर हा फक्त एक मराठी नाटकातील कलाकार, एक लेखक, एक दिग्दर्शक, एक निर्माता, एक मराठी माणूस राहत नाही; तो आपला माणूस बनून जातो.