Sunday, January 9, 2011
|| तेंदुल-पुराण ||
प्रस्तावना: युगांतर
सगळ्यात आधी शून्य होता, आणि त्या नंतर आले महादेव!! सत्युगात राम, लक्ष्मण वगैरेंना त्यांची आई शिव शंभोंच्या गोष्टी सांगे.
युग बदलले आणि द्वापारयुगात खुद्द श्री राम देवता बनले. कन्हैया ला यशोदा माई रामाच्या गोष्टी सांगे.
हा हा म्हणता कलियुग आले - या कलियुगाचे एक वैशिष्ट्य मला जाणवले - it adapts, absorbs and amplifies!!
नाही समजले ? एक उदाहरण पाहूया.
पूर्वी फक्त कलियुग होते म्हणे, मग मोगलाई आली - तर कलियुगाने मोगलाई ला आपलेसे केले, आपल्यात सामावून घेतले आणि मग आपलाच [कलियुगाचा] प्रभाव वाढवला!!
Vanilla कलियुगात, म्हणजे दंडकारण्यात मोगलाई माजण्या आधी - बाल वयातल्या ज्ञानोबांनी श्री कृष्ण गाथेचा आणि गीतेचा परवचा अनुभवला.
कलियुगाचे अजून एक वैशिष्ट्य आहे बर का - flavor कुठला ही असो - या युगात होते ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची मनुष्य हानीच!!
कधी सम्राट अशोक सत्तेच्या धुन्दीत नर संहार करतो, तर कधी औरंगझेब तर कधी हिटलर आणि अमेरिकन अनु बॉम्ब!! असो ..
तर कालांतराने वर्ष सरली आणि ज्या दंडकारण्यात पाय ठेवायचे धाडस फक्त श्री राम करू शकले किंवा पांडव, त्याच दंडकारण्यात मोगलाई माजली!!
कपाटात लपून बसलेले समर्थ उत्तरले, "चिंता करितो विश्वाची!!"
हि प्रस्तावना असली तरी थोडसं आगाऊ पणेच मला विचारावेसे वाटते कि खरच, समर्थांना कसली चिंता सतावीत होती?
सज्जनगडाच्या पायथ्याशी वाढलो म्हणून याचे उत्तर माझ्या परीने द्यायचे धाडस करतोय -
त्यांना चिंता होती कि सभोवताली माजलेल्या हाहाकाराने आणि अराजाकतेने लोकांची श्रद्धा धासलतीये, लोकांचा आत्म-विश्वास दल्मल्तोय, आणि याने समाजाची वहिवाट मोडून जायील.
एक त्रिवार सत्य प्रत्येक युगात अबाधीत आहे - Masses need Heroes to follow, organise and excel!!
आणि प्रत्येक युगात आपल्याला एक hero मिळाला - एक युगपुरुष, एक देव, एक असे व्यक्तिमत्व ज्याने समाजाला एका सूत्रात गुंफले, त्यांना एकत्र आणले, त्यांच्या पुढे जगण्याचा आदर्श ठेवला.
या युग पुरुषांचा स्वतःचा जीवनपट असा होता कि त्यातून लोक बोध घेतील आणि देतील, लोक जगणं समजतील आणि शिकतील, त्याच्यावरच्या भक्ती पोटी लोक स्वताहावर विश्वास ठेवतील, निर्भय बनतील, सुजाण बनतील ..
रामा साठी शिवशंकर युगपुरुष ठरला, कृष्णा साठी राम युगपुरुष ठरला, ज्ञानेश्वरानसाठी श्री कृष्ण.
थोड्या वेळा पूर्वी सम्राट अशोकाचा उल्लेख केला म्हणून मुद्दाम लिहावेसे वाटते - अशोकाला सुद्धा गौतम बुद्धाची गरज पडली - युद्धाने बिथरलेल्या त्याच्या रयतेला परत माणसात आणण्यासाठी!!
समर्थांना चिंता लागली होती कारण ज्या युगपुर्षांचे गुणगान ऐकून रयत वाढली होती, त्यांचीच मंदिरे फुटत होती, उभी पीके नाहीशी होत होती, जळत होती, अब्रूचे धिंडवडे निघत होते, आणि तरीही ज्या Hero ची लोकांना गरज होती तो कुठे ही नव्हता!!
योगायाग म्हणा किंवा योग्य योग - याच सुमारास रामाच्या आणि कृष्णाच्या कथा ऐकून वाढत असलेला शिवबा जरा इतरांच्या पेक्षा वेगळा होता - त्याने या सर्व अत्याचारा विरुध्द कंबर कसली आणि स्थापिले स्वराज्य, सुराज्य. रयतेला नवीन युगपुरुष मिळाला - श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात शिवाजी महाराजांची गाथा एक प्रेरणा स्त्रोत ठरली.
पुढे जाण्या आधी धावता उल्लेख - समर्थांनी नुसती चिंता केली नाही - तर मंदिरे बांधली, आखाडे काढले, ओव्या लिहिल्या, लोक प्रबोधन केले आणि हो शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची भरारी पाहून त्यांना नक्कीच हायसं वाटलं असणार.
बर .. आता मोगलाई संपली, ब्रिटीश राज झाला, महायुद्धांचा धूम धडाका झाला आणि आता आपलं हे युग एका नवीन flavor मध्ये न्हाऊन निघालय - तो flavor आहे प्रसार माध्यमाचा. Internet म्हणा किंवा Television म्हणा - मला या माध्यमाला ना चांगले म्हणायचं ना वाईट - फक्त ताकदवान म्हणायचं - क्षणात संपूर्ण जगात आनंद पसरवणे किंवा दुखाची लाट आणणे शक्य आहे ते फक्त यांनाच!!
कलियुगाचे नवीन नाव कदचीत भ्रष्टाचार असेल, पण या युगाचा, या जमान्याचा सध्याचा flavor आहे प्रसार माध्यम!!
अध्याय पहिला: कलीचे माध्यम
लादेन हा वाईट आहे हे संपूर्ण जगाला समजायला फक्त काही क्षण लागले असतील. Formula One मध्ये ज्या वेगाने गाड्या धावतात, तितक्याच वेगाने त्यांची यशोगाथा संपूर्ण विश्व भरात समजते. एखादा चित्रपट चालला, एखादी विकेट घेतली, एखादा व्यायाम शिकवला, एखादा kiss घेतला तरी आज लोकांना प्रसिद्धी मिळते .. क्षणात मिळणारी क्षणभंगुर प्रसिद्धी!!
कधी या प्रसिद्धीचे व्यसन लागते तर कधी या प्रसिद्धीने जीव कावतो!!
प्रसार माध्यमान साठी हे सगळं BAU आहे - "Business As Usual" आणि मला या बद्दल कोणता ही आक्षेप नाही किंवा तक्रार नाही.
आक्षेप घेण्या सारख्या, तक्रार करण्या सारख्या सध्या या जगात किती तरी गोष्टी आहेत - भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, महागाई .. उफ!!
आणि मला असे काही मित्र माहित आहेत, जे त्यांच्या ब्लॉग्स मधून या बद्दल बरंच लिहितात - आज याच प्रसार माध्यमांच्या मांदियाळी मुळे कित्येक रामदासांची चिंता लगेच प्रकशीत होत आहे :-)
तुम्ही जर हे वाचताय तर एवाना तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि हा ब्लॉग कशा बद्दल आहे नक्की? प्रसार माध्यमे??
तर नाही - पण मला इथे त्या समर्थांच्या कपाटातील एक खाना उघडायचा आहे. एक असा कप्पा ज्याची चावी आहे प्रसार माध्यम.
लहानपणी मी शिवाजी महाराजांची पुस्तके वाचली, इतिहासाच्या अभ्यासात त्यांचा जीवनपट पहिला, शिवाजी महाराज, जिजाऊ, त्यांचा प्रत्येक मावला, त्यांचा प्रत्येक पराक्रम - हा एक प्रेरणा स्त्रोत होता - शिवाजी महाराज माझे Hero होते आणि आहेत. या जामन्या साठी ते युग पुरुष आहेत.
गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलताना पाहतोय मी - एकाच माणसाचे 3-4 वाढ दिवस साजरे होतात वर्षातून, त्यांच्या शिक्षकानवरती प्रश्न चिन्ह उभारली जात आहेत, जिजाऊंचे चारित्र्य ही मलीन करण्या पासून आजचा भस्मासुर मागे राहिला नाही.
आमच्या युगपुरुषाचे राजकारण केलंय काही मोजक्या लोकांनी, आणि या राजकारणात आपला समाज एक युगपुरुष हरवत चालला आहे.
बरं, सध्याचा धार्मिक आलेख ही तितकासा चांगला नाही. जितक्या दंगली होतात जाती-धर्मा वरून, त्यातून नवीन पिढीचा धर्मा विषयी त्रयस्त पणा वाढत चालला आहे. "रामाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका - आधी त्याचा जन्म कुठे झाला होता ते पक्कं करा", अशी उत्तरे ऐकू यायला फार वेळ लागणार नाही.
आणि हा वेळ फार लागणार नाही कारण आजची प्रसार माध्यमे खूप शक्ती शाली आहेत. ते तटस्थपणे फक्त लोकांची वक्तव्ये प्रकाशीत करीत राहिले तरीही त्यांची व्याप्ती इतकी आहे कि भीती वाटते!! आज मोगलाई नाहीये तरीही लोकांची श्रद्धा स्थाने ढासळू लागलीयेत, त्यांना शतकानु शतके एकत्र गुंफणारा दुवा झिजू लागला आहे. इथे प्रत्येक दिवशी एक नवीन hero झळकतो आणि दुसर्याच दिवशी लोक त्याच्या घरावर मोर्चे नेताना दिसतात!!
कलीचे हे माध्यम आणि या माध्यमाचा विळखा यात आपल्या समाजाचे युगपुरुष हरवून जाणार का?? आज पासून पन्नास वर्षांनी समर्थांना पुन्हा आरोळी ठोकावी लागणार का "चिंता करितो विश्वाची"
अध्याय दुसरा: आम्ही SRTians
Daily soap च्या प्रभावा खाली मी ही या पूर्वीच्या अध्यायाला थोडेसे 'suspense thriller' ending दिले :-P
आणि पुढील पिढीची चिंता वगैरे करायची काहीही गरज नाहीये बर का!! कारण युगपुरुषांची परंपरा already continue झालीये.
त्या बद्दल हे थोडासा विवेचन -
आणि हो, मी परवाच आमच्या chat room मध्ये बोलून गेलो - कि भारता मध्ये सामाजिक बंधने कदचीत असतील, पण धार्मिक स्वातंत्र्य पुरेपूर आहे. त्यामुळेच इथे रोज नवीन बाबा उदयाला येतात, नवीन पंथ बनतात, नवीन पुराने लिहिली जातात.
याच स्वातंत्र्याच्या जोरावर तर मी हा अध्याय लिहिण्याची आणि थोडीसी भाटगिरी करण्याची चेष्टा करतोय.
"If Cricket is a religion, Sachin is God"
खरं सांगायचा तर मला Cricket मधला C पण कळत नाही. कळते ते फक्त 'B' - Ball आणि Bat. चेंडू फेकायचा आणि तो Bat नि मारायचा. कधीतरी शरीर हललेच तर fielding पण करायची :-D
त्या मुळे मी त्याचा Straight Drive कसा perfect आहे, आणि त्याचे hooks कसे वेड लावतात या बद्दल फार लिहिणार नाहीये. ते सगळं वाचायला "Blogs I follow" refer करा - बरेच शौकीन लोकांचे blogs वाचायला मिळतील :-)
शिव शंकराने म्हणे तांडव केले आणि प्रलय आला.
साल 2003. World Cup. भारत पाकिस्तान match. तेंडल्या नि त्याच्या bat नि तांडव केले मैदानात. आणि प्रलय आला कि नाही हे शोईब अख्तर आणि वसीम अक्रम ला विचारूया का??
"देवो मे देव महादेव" म्हणतात. म्हणजे बाकी सगळे फक्त देव आणि शंकर भगवान all-rounder, best of all. अहो, cricket मध्ये best-of-best = Sachin. किती Records, किती milestones, किती matches, कितीतरी ठेवणीतले Shots, किती भारदस्त all-rounder cricket!!
भोला शंकर म्हणजे समस्त विश्वाचा स्वामी असूनही वैराग्याचा पुतळा - तेंडल्या इतका मोठा celebrity, पण त्याला page 3 वरती कोणी पाहिलंय का आज पर्यंत?
मर्यादा पुरषोत्तम - राम.
वडिलांनी सांगितले राज्य कारभार सोडून दे, वनवासाला जा. राम बायको आणि भावाला घेऊन निघाला.
मुलतान चे ground. तेंद्ल्याचा score 194. Overs remaining 16. आणि Captain नि सांगितले innings declare करायचीये, परत ये. चकार शब्द ही न बोलता तेंडल्या ground मधून बाहेर पडला...
एका धोब्याने श्रीरामा बद्दल बोभाटा केला - आणि सीतामाई बद्दल ही.
Ferrari चा किस्सा आठवतोय? Fiat company ने त्याला ती भेट म्हणून दिली, आणि सरकार ने ती भेट सचिन च्या खेळाचे कौतुक म्हणून दिलीये हे लक्षात घेऊन त्या वरचा कर माफ केला. केवढा गदारोळ माजवला त्या साठी त्या धोब्याच्या अनुयायांनी!!
श्री राम पूर्वी ऋषी मुनींना त्यांच्या यज्ञ कर्मात मदत करीत - दैत्यांन पासून त्यांचे रक्षण करून. पण तेवढ्या वर त्यांना कोण स्वस्थ बसून देतंय. असुरांचा सर्वात मोठा राजा जो रावण - तो मारल्या शिवाय त्यांचे जीवन कर्म सफल होऊ शकले नाही.
गम्मत पहा - 6 महिन्या पूर्वी मला स्वप्न पडलं होतं - कि तेन्द्ल्याच्या 100 centuries पूर्ण झाल्यात. परवा परत स्वप्न पडलं - तेन्द्ल्याची 150 वी century पूर्ण झालीये :-)
Cricket मधील - तेन्द्ल्याच्या कर्म भूमी मधील सर्वोच्च शिखर तेन्द्ल्याने पूर्ण करावे हे आमचे स्वप्न - आणि तेंडल्या ते पूर्ण करण्या साठी आज ही लढतोय!!
शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला एक नवीन उमेद दिली, त्याच्या आयुष्याला एक नवी उभारी दिली, एक देवा-ब्राह्मणांच्या आशीर्वादाने पुलकीत झालेलं स्वराज्य उभं केलं.
आज सचिन रमेश तेंडूलकर, हे नाव आमचे गौरव स्थान आहे.
आम्हाला Persistence आणि Practice चा धडा तेंडल्या देतो.
"Impossible is nothing" हे आम्हाला तेंडल्या शिकवतो.
"Your only competition is you" हे सत्यात तेन्द्ल्याने उतरवून दाखवलंय.
"उमड-घुमड कर जीरा गर्जे...
दिल येह बोले, झूम के बोले, तारे छू ले...
अरे प्यास बढी है ..
प्यास बढी है और भी बढ ले...
खोल के बंधन, तोड के ताले, येह दिल मांगे moooooore!" हि प्यास तेन्द्ल्यानी वाढवली.
जेव्हा मोगलाई ने बेजार जनता हताश झाली होती, तेव्हा त्यांना आधार होतं तो फक्त शिवबाचा.
ती वर्ष आठवतायत?
जेव्हा क्रिकेट चा वीट आला होता आपल्या सगळ्यांना ....
किती ती match fixing ची scandals, आणि किती खेळाडू, किती matches वर शिंतोडे!! त्या वेळेस match लागली कि पूर्ण match मी कधीच पहिली नाही - पहिली ती फक्त सचिन ची batting.
आणि जसा Babe Ruth नि संकट समयी Baseball तारला, तसाच तेन्द्ल्यानी Cricket ला तारून नेले - आजच्या धोनी आणि कार्तिक साठी.
आज भारता मध्ये Cricket च जे एक साम्राज्य उभं आहे, त्याचा श्रेय भले ही बरेच राजकारणी घेतील, पण आम्ही ते श्रेय देवू फक्त तेन्द्ल्याला.
कर्मयोगी, राजयोगी ही विशेषणे जितकी शिवबांची तितकीच तेन्द्ल्याची!!
प्रत्येक युगपुरुष आज आपल्याला सचिन मध्ये लपलेला दिसतो - आणि हीच तो युगपुरुष असल्याची नांदी आहे.
बर, युगपुरुष असणे आणि लोकांचा Hero असणे एकच आहे का?
जर नसेल तर अजून एक उदाहरण पाहू. अमीर खान - सीने श्रुस्ती मधला मान्यवर Actor - Superstar. याचे मला एका गोष्टी साठी कौतुक वाटते - त्याने आपल्या कार्यकिर्दीत, येणाऱ्या प्रत्येक नवीन युवा पिढीला impress केलंय. म्हणजे असं पहा - आधी "पापा केहते है बडा नाम करेगा", मग काही वर्ष गेली - अगदी generation gap होण्या इतकी, आणि आले "पेहला नशा, पेहला खुमार". ती पिढी नोकरी धंद्याला लागली [कालेज्यातून बाहेर पडून] आणि आले "हम है नये, अंदाज क्यू हो पुराना" आणि आता जेव्हा ते दिवस ही जुने झाले तेव्हा आले आहे "आल इज वेल !!"
तर या अमीर ला 5 वर्ष लागतात परत नवीन पिढी साठी एक मंत्र द्यायला - पण तेन्द्ल्याचा नवीन जप सुरु व्हायला फक्त पुढची series यावी लागते. [एक पत्नी व्रता या बद्दल मी बोलत ही नाहीये आज. प्रेम करायचं आणि टिकवायच कसं ते ही शिकवून जातो तेंडल्या].
आज जेव्हा एखादा 35 वर्षीय बाप त्याच्या मुलाला Cricket Techniques वर धडे देतो, तेव्हा तो त्याच्या लहान पणा पासून बघत आलेली तेन्द्ल्याची batting आठवतो - आणि त्या प्रमाणे मार्गदर्शन करतो. बेस्ट पार्ट - त्याचा मुलगा next match मध्ये तेन्द्ल्याला live पाहतो आणि त्या techniques पटकन शिकून जातो.
गेली 20 वर्षे, जग भरातील मुल-मुली वाढत आहेत, ते तेन्द्ल्याचा खेळ पाहून आणि शिकून, युवक कल्लोळ करतात ते त्याचे षटकार पाहून, ग्रीहस्त आरामात सुट्टी घालवतात ते त्याच्या innings बघून, senior -citizen clubs मध्ये गप्पा रंगतात ते त्याच्या रेकॉर्ड्स चा पाढा वाचून!!
In Last 20 years, there has been at least one moment when any and every person watching cricket has been amazed, enthralled and enchanted by the magnificence and magic called Sachin.
याच्या पेक्षा Hero अजून वेगळा असतो का?
आणि ज्या प्रसार माध्यमांचा बाऊ मी मघाशी केला होता - त्यांच्या वर या पठ्ठ्याने कधीच मात मिळवली आहे.
क्षण भंगुर प्रसिद्धीच्या मागे तेंडल्या कधीच दिसला नाहीये, त्याला अश्या प्रसिद्धीची गरज हि पडली नाही. गेल्या वीस वर्षात, त्याने न उगाच कोणाची हिणकस टीका केलीये, न कोणाच्या चिखल फेकिला भीक घातलीये. प्रसार माध्यमांच्या जहाल पणा वर त्याने कधीचीच मात केलीये.
कदाचित त्यामुळेच हि माध्यमे पण त्याला शरण गेलेली दिसतात. तेन्द्ल्याची innings असेल तर करोडो लोक TV ला चिटकून राहतात. ऑफिस मधले floors चे floors फक्त internet brower वरती score आणि live commentary पाहत असतात.
Match चालू असल्याने काम राहिले तर manager खाकरून इशारा करीत नाही कि आता पुरे, दिलेली assignment संपवा आधी; तो करूच शकत नाही कारण तसं करणं फाउल आहे आणि तो ते जाणतो.
सौ बातो कि एक बात: Sachin is our god and we are SRTians!!
[विस्तारा सहीत स्पष्टीकरण: Christ ला देव मानणारे Christians, तसेच SRT ला देव मानणारे SRTians]
अध्याय तिसरा: संचित
लोकांना कदचीत हिंदू-मुस्लीम, मुस्लीम-Christian वगैरे वादाचा तिटकारा येयील. पण या सगळ्यांचा एक देव कायम राहील - SRT.
या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र गुंफणारा एक अदृश्य धागा म्हणजे SRT. [पुणेरी पाटी: धागा अदृश्य आहे, SRT नाही - या बद्दल कोणीही फालतू comment करू नयेत, हुकुमा वरून :-)]
ती तेन्द्ल्याचे मुखवटे घातलेली मुले आठवतायत जाहिराती मधली .. आज सगळ्या जगातल्या क्रिकेट प्रेमीन वरती हा मुखवटा चढला आहे, आणि हळू हळू जस जसे लोक एक रोल मॉडेल शोधतील तस तसे ते तेन्द्ल्याच्या चाहते वर्गात भरती होत राहतील.
SRT युगपुरुष बनणे हे सन्चीत आहे, आणि या युगपुरुषाची गाथा पुढची अनेक युगान्तरे गाणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
kevDhi ti baDbaD...pan tenDlyaa saaThi hoti mhanun vaachli...tyaa sathi yevdha motha post vaachu shakto..itar kahi lihila astas tar bahutek nasta vachla..
Wah PR !!
Amazing lihilay.
Superlike :)
Wa Wah....Avadale bhayankar.....
Post a Comment