Blog Archive

Thursday, December 1, 2011

कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं

कोलावरी दी गाणं --> कोल्हापुरी रस्सा गाणं --> सातारी गाणं :-)
[काल CS च्या मराठी चाट-रूम मध्ये गम्मत म्हणून पहिली लाईन लिहिली होती, आत्ता विचार केला बघूया शेवट पर्यंत जाता येतंय का ते]

कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
आरं,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
भारी हाय लई हीतला जर्दा, किक हाई लयी झाक,
पाणी तोंडाला सुटलं सुटलं, चौपात्ती ती नेक !!

कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
ए,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,

चमचमीत ती स्वाद भेळ, खावून फिटल दाम,
सुपनेकरी वडा, मिसळ, आवडल समद्यांना जाम !!

कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,

इंटर नेशनल आमची मिठाई, पाटी मोदीच्या दुका-नात,
लयी डिमांड, चेंगरा चेंगरी, फुलं कासच्या पठारात !!

कासला ..
मटण न्यावं, जांभूळ खावं,
पाण्यात डुंबून रहावं !!

यावं यावं, गडावर जावं,
राम-नाम घ्यावं !!
राम राम घोकून जावं,
लापशी मिळल ती खावं,
ठोसेघर अन धरण बघाया, तसच पुढं जावं !!

महाबळेश्वर, पाचगणी, कण्हेर धरण,
गावात अण्णा अन चार-भिंतीची शान !!

कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं,
हे,
कंदी पेढा आंबा बर्फी सातारी सातारी रं !!

2 comments:

विवेक said...

Wah Prasad! Mast Jamaliye "Satari..." - Vivek K

nilesh said...

Prasad.......college chya time chi athawan ali bagh....