Blog Archive

Thursday, February 13, 2014

एक ठिगळलेलं आभाळ

आयुष्याचे रंग उधळता उधळता,
उगीचंच माझं आभाळ फाटलं.

आणि सर्वत्र दिसू लागल्या त्या बघ्यांच्या खोचक नजरा,
मित्रांचे बदललेले अंतरंग,
आणि गिधाडांची वाढलेली गस्त !!

मग ठरवलं, हे भगदाड मिटवून टाकायचं,
कष्टाची शिडी त्या आभाळापर्यंत बांधायची,
आणि आभाळालाही एक ठिगळ लावायचं !!

आज त्या आभाळावर एका हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा आहे,
उपरयांच्या नजरा आता अंतरंगात डोकावत नाहीत,
आणि प्रश्नांच्या उत्तरांना आता उगीचच फाटे फुटत नाहीत.

पण तरी मधेच केव्हातरी अंधारात,
निर्धाराचे टाके सैल पडतात,
त्यातून वाहणारी थंड, बोचरी हवा अंतर-विश्व गोठवून टाकते,
आणि पांघरुणात आणलेला शांत झोपेचा आव,
त्या ठिगळलेलं आभाळावाटे क्षणात नाहीसा होतो !!

-परसुराम


No comments: